Friday 16 June 2017

थोर विचारवंत व त्यांचे विचार

  जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.
अब्राहम लिंकन
अपयशी झाल्यावर आपल्याला अपयश का आले? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते, मात्र यशस्वी झाल्यावर एका शब्दाचेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही.
ॲडॉल्फ हिटलर

पहिले यश मिळाल्यानंतर स्वस्थ बसू नका कारण दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणेल की पहिलं यश केवळ नशीबाने मिळाले होते.
ए. पी. जे. अब्दुल कलाम
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.
बाबासाहेब आंबेडकर
 रडू नकोस, रडायला वेळ तरी कुठे आहे? स्वतःच्या अंतरंगात दीप चेतव. त्या दीपाच्या प्रकाशात निर्वाणपद प्राप्त करण्याचा मार्ग शोध.
 बुद्ध

दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.
 स्वामी विवेकानंद